IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाने सहा वर्षांनंतर भारतात जिंकला कसोटी सामना, इंदूरमध्ये टीम इंडियाचा नऊ विकेटने पराभव

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज आहे.

IND vs AUS

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह त्यांनी मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिले दोन कसोटी सामने जिंकूनही भारत 2-1 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) 78 धावा करत सामना आपल्या नावावर केला. यासह ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली आहे. आता दोन्ही देशांमधील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडिया 33.2 षटकात अवघ्या 109 धावांवर आटोपली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ 76.3 षटकात 197 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 88 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 60 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 60.3 षटकात 163 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 59 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या