WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, या महान खेळाडूंना संधी; येथे पहा संपूर्ण संघ
ऑस्ट्रेलियाने कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड या चार वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC WTC Final 2023) या हंगामातील अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. 12 जून हा सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड या चार वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे, तर कॅमेरून ग्रीन आणि मिचेल मार्शच्या रूपाने दोन वेगवान अष्टपैलू खेळाडू संघाचा भाग आहेत. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उप-कर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.
राखीव खेळाडू: मिचेल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)