Australia Beat New Zealand: ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 5 धावांनी केला पराभव, रचिन रवींद्रची शतकी खेळी वाया

रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 49.2 षटकात 388 धावा करत सर्वबाद 388 धावा केल्या.

2023च्या विश्वचषकात आज दोन सामने खेळले जात आहेत. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात धर्मशाला येथे झाला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 49.2 षटकात 388 धावा करत सर्वबाद 388 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 109 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 383 धावा करू शकला. न्यूझीलंडकडून स्टार युवा फलंदाज रचिन रवींद्रने सर्वाधिक 116 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now