AUS-W vs ENG-W 1st T20I: इंग्लंडचा 9 विकेटने दारुण पराभव, मेग लॅनिंग आणि ताहलिया मॅकग्रा यांच्या दणदणीत फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय
लॅनिंगने 64 आणि मॅकग्राने सर्वाधिक 91 धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 170 धावांचे लक्ष्य नऊ गडी राखून आणि तीन षटके शिल्लक असताना विजयीरेष ओलांडून महिला अॅशेस बहु-स्वरूपी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
AUS-W vs ENG-W 1st T20I: कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) आणि ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) यांच्या दणदणीत अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने (Australia) अॅशेस मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 9 विकेटने धूळ चारली. लॅनिंगने 64 आणि मॅकग्राने सर्वाधिक 91 धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करताना मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)