AUS vs NED Warm-Up Match: अभ्यास सामन्यात ऑस्ट्रलियाच्या मिचेल स्टार्कची घातक गोलंदाजी, नेदरलँड्सविरुद्ध घेतली हॅट्ट्रिक

ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमावून 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडची सुरुवात निराशाजनक झाली.

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या आधीच्या 5व्या सराव सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने नेदरलँड्सविरुद्ध घातक गोलंदाजी करताना हॅट्ट्रिक घेतली आहे. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. अशा स्थितीत षटके कमी करण्यात आली आणि दोन्ही संघांना 23-23 षटके खेळण्याची संधी देण्यात आली. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमावून 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडची सुरुवात निराशाजनक झाली. मिचेल स्टार्कने नेदरलँडचा सलामीवीर मॅक्स ओडाऊडला पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर LBW आऊट केले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिचेल स्टार्कने वेस्ली बॅरेसीला क्लीन बोल्ड केले. यानंतर तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर बास डी लीडेला बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. नेदरलँडचे तिन्ही फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत आणि सर्वजण गोल्डन डकचे बळी ठरले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement