Asian Games 2023 पाकिस्तानने संघाची केली घोषणा, 'हा' 20 वर्षीय खेळाडू झाला कर्णधार

पाकिस्तानने आशियाई खेळ 2023 साठी आपला संघ जाहीर Pakistan Announced the Team) केला आहे. 20 वर्षीय कासिम अक्रमला (Qasim Akram) संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

Pakistan Squad For Asian Games 2023: आशियाई गेम्स 2023 (Asian Games 2023) 17 सप्टेंबरपासून चीनच्या हांगझोऊ शहरात होणार आहेत. यावेळी क्रिकेट या खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग करण्यात आला आहे. आता पाकिस्तानने आशियाई गेम्स 2023 साठी आपला संघ जाहीर Pakistan Announced the Team) केला आहे. 20 वर्षीय कासिम अक्रमला (Qasim Akram) संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. कर्णधार कासिम अक्रमने पाकिस्तानसाठी 20 प्रथम श्रेणी सामने आणि 40 टी-20 सामने खेळले आहेत. 2022 च्या अंडर-19 विश्वचषकातही त्याने कर्णधारपद भूषवले आहे. पाकिस्तानच्या संघातील 15 खेळाडूंपैकी 8 असे खेळाडू आहेत जे यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून खेळले आहेत.

आशियाई गेम्ससाठी 2023 साठी पाकिस्तानी संघ:

कासिम अक्रम (कर्णधार), ओमेर बिन युसूफ (उपकर्णधार), अमीर जमाल, अराफत मिन्हास, अर्शद इक्बाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्झा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर), रोहेल नजीर, शाहनवाज डहानी, सुफियान मुकीम आणि उस्मान कादिर.

राखीव खेळाडू - अब्दुल वाहिद बंगलझाई, मेहरान मुमताज, मोहम्मद इम्रान ज्युनियर, मोहम्मद इरफान खान नियाझी आणि मुबासिर खान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now