SL vs NAM T20 WC 2022: आशिया चषक चॅम्पियन श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात पराभव, नामिबिया संघाचा ऐतिहासिक विजय
जिलॉन्ग येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाने 163 धावांचे यशस्वी बचाव केले आणि संपूर्ण श्रीलंकेचा संघ 108 धावांत गारद झाला.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाला (SL) मोठा धक्का बसला आहे. नामिबियाने (NAM) आशिया चषक 2022 च्या विजेत्या संघाचा पहिल्या फेरीतील गट सामन्यात 55 धावांनी पराभव केला. जिलॉन्ग येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाने 163 धावांचे यशस्वी बचाव केले आणि संपूर्ण श्रीलंकेचा संघ 108 धावांत गारद झाला. श्रीलंकेकडून कर्णधार दाशून शनाकाने सर्वाधिक 29 धावा केल्या तर नामिबियातर्फे डेव्हिड विजे, बर्नार्ड शॉल्झ, बेन शिकागो आणि जेन फ्रायलिंक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)