Ashes 2021-22: बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी, ऑस्ट्रेलियन ताफ्यात आणखी एक स्फोटक वेगवान गोलंदाजाची एन्ट्री
व्हिक्टोरियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड याचा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे होणार्या अॅशेस मालिकेतील तिसर्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. शेफिल्ड शिल्डमध्ये बोलंडने चांगलीच छाप पाडली आहे. तो त्याच्या घरच्या मैदानावर, एमसीजीमध्ये पदार्पण करू शकतो.
व्हिक्टोरियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) याचा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melburne Cricket Ground) येथे होणार्या अॅशेस मालिकेतील (Ashes Series) तिसर्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडचा सहभाग आत्तापर्यंत संशयास्पद आहे आणि तो अद्याप त्याच्या साईड स्ट्रेनच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)