Ashes 2021-22: इंग्लंडविरुद्ध ‘या’ तडाखेबाज यष्टिरक्षकाला ऑस्ट्रेलिया संघात पदार्पणाची संधी, पहिल्या दोन कसोटीत Tim Paine याच्या जागी समावेश
मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या अॅलेक्स कॅरीने पहिल्या दोन अॅशेस कसोटीसाठी यष्टीमागे माजी कर्णधार टिम पेनची जागा घेण्याच्या लढाईत बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियन निवड समितीने गाबा येथे होणाऱ्या पहिल्या अॅशेस कसोटीसाठी कॅरीच्या नावाची घोषणा केली आहे. 30 वर्षीय खेळाडूला जोश इंग्लिस आणि गोलंदाज जिमी पिअरसन यांच्याशी स्पर्धा करावी लागली.
इंग्लंडविरुद्ध (England) अॅशेस मालिकेच्या (Ashes Series) पहिल्या कसोटी सामन्यातून अॅलेक्स कॅरी (Alex Carey) ऑस्ट्रेलियासाठी (Australia) कसोटी पदार्पण करेल आणि त्याला टिम पेनचा दीर्घकालीन वारसदार म्हणून कसोटी यष्टीरक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)