Archana Devi Viral Catch Video: U19 महिला T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्चना देवीने पकडला आश्चर्यकारक झेल, पहा व्हिडीओ
ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला. टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ निर्धारित 17.1 षटकांत अवघ्या 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक 19 धावा केल्या. टीम इंडियाकडून टीटा साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात असा झेल पाहायला मिळाला जो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल, भारतीय खेळाडू अर्चना देवीने परशवी चोप्राच्या चेंडूवर एक सुंदर झेल टिपला.
पहा व्हिडीओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2023 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

