Virat Kohli Century: विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्माने दिली अशी प्रतिक्रिया, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 121 धावांची शानदार खेळी केली होती. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वे शतक होते. कोहलीच्या शतकावर पत्नी अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली. शतकानंतर किंग कोहलीने मैदानावर लग्नाच्या अंगठीला किस केले.

Virat Kohli Century: विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्माने दिली अशी प्रतिक्रिया, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
Virat Kohli And Anushka Sharma (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या दिवशीही खेळ सुरूच आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्रिनिदाद कसोटीत शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 121 धावांची शानदार खेळी केली होती. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वे शतक होते. कोहलीच्या शतकावर पत्नी अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली. शतकानंतर किंग कोहलीने मैदानावर लग्नाच्या अंगठीला किस केले. यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर कोहलीचा फोटो शेअर करून प्रतिक्रिया दिली. अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर कोहलीचा फोटो शेअर केला आणि हार्ट इमोजी बनवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 11:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).