IND vs BAN ODI 2022: तस्कीन अहमद नंतर  बांगलादेशला आणखी एक धक्का, हा सर्वात मोठा खेळाडू वनडेतुन बाहेर

रिपोर्ट्सनुसार, 30 नोव्हेंबर रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यादरम्यान तमीमला दुखापत झाली होती.

Tamim Iqbal (Photo Credit - Twitter)

Tamim Iqbal: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 4 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेशला दोन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार तमीम इक्बाल (Tamim Iqbal) मालिकेतून बाहेर आहे. तसेच, 14 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीतही तो खेळणे साशंक आहे. बांगलादेशी संघाला गोलंदाजीत झटका बसला. स्विंगमध्ये मास्टर असलेल्या तस्किन अहमदला पहिल्या वनडेत खेळणे कठीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 30 नोव्हेंबर रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यादरम्यान तमीमला दुखापत झाली होती. कंबरेच्या दुखापतीमुळे तमिमला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now