CSK vs GT, IPL Final 2023 Live Update: चेन्नई संघाला बसला दुसरा मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड नंतर डेव्हॉन कॉन्वे बाद

आता चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य आहे.

CSK vs GT, IPL Final 2023 Live Update: चेन्नई संघाला बसला दुसरा मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड नंतर डेव्हॉन कॉन्वे बाद

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 96 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दरम्यान, दुसरा डाव सुरु झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि खेळाला उशीर झाल्याने हा सामना 12.10 वाजता सुरू झाला. आता चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करता चेन्नई संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्कोर 79/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2023 12:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).