Jasprit Bumrah Magical Yorked: इशांत शर्माच्या धोकादायक यॉर्करला आंद्रे रसेल पडला बळी, गेला चक्रावून; पाहा व्हिडिओ
आंद्रे रसेलने 19 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 41 धावांची खेळी खेळली, मात्र त्याला इशांत शर्माने धोकादायक यार्कर टाकून क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
DC vs KKR, IPL 2024 16th Match: आयपीएल 2024 च्या 16 व्या (IPL 2024) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (KKR vs DC) ऐतिहासिक धावसंख्या उभारली आहे. एसआरएचचा 277 धावांचा विक्रम त्यांना मोडता आला नसला तरी केकेआरच्या फलंदाजांनी स्कोअरबोर्डवर 272 धावा केल्या आहेत. सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनीही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आंद्रे रसेलने 19 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 41 धावांची खेळी खेळली, मात्र त्याला इशांत शर्माने धोकादायक यार्कर टाकून क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता आऊट झाल्यानंतर रसेलची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)