Anand Mahindra यांनी दिलेला शब्द केला पूर्ण, Sarfaraz चे वडील Naushad Khan यांना गिफ्ट केली 'थार' (Watch Video)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर सरफराज खानने इंग्लंड मालिकेत भारताकडून पदार्पण केले. सरफराजच्या पदार्पणाच्या निमित्ताने वडील नौशाद खान भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अलीकडेच टीम इंडियासाठी पदार्पण केलेल्या सरफराजचे (Sarfaraz Khan) वडील नौशाद खान (Naushad Khan) यांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. सरफराजचे वडील नौशाद खान यांना आनंद महिंद्रा यांनी थार भेट दिली आहे. सरफराज खानने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर सरफराज खानने इंग्लंड मालिकेत भारताकडून पदार्पण केले. सरफराजच्या पदार्पणाच्या निमित्ताने वडील नौशाद खान भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. वडिलांच्या मेहनतीने प्रेरित होऊन आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना थार देण्याची घोषणा केली होती, जी त्यांनी आता पूर्ण केली आहे. जेव्हा सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना ही भेट मिळाली तेव्हा नौशाद खान व्यतिरिक्त सरफराज खान आणि त्यांचे दोन लहान भाऊही उपस्थित होते.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement