Most ducks in IPL history: रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला हा लाजिरवाणा विक्रम, दिनेश कार्तिक आहे पहिल्या स्थानावर

शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma (Photo Credit - Twiter)

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 चा 46 वा सामना जिंकला असेल, पण रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खाते न उघडताच माघारी परतला. शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा चौथा खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर आहे दिनेश कार्तिक, जो 15 वेळा डक झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मनदीप सिंग आहे, जो या लीगमध्ये 15 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत अंबाती रायडू देखील आहे, जो 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement