Ambati Rayudu Retirement Retirement From IPL: अंबाती रायुडूची निवृत्तीची घोषणा, गुजरातविरुद्धचा अंतिम सामना असेल आयपीएलचा शेवटचा सामना
एका ट्विटमध्ये रायडूने चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे आभार मानले आहेत. यावेळी आपण आपला निर्णय बदलणार नसल्याचेही रायडूने सांगितले.
चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने (Ambati Rayudu Retiremen) आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूने रविवारी (28 मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. एका ट्विटमध्ये रायडूने चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे आभार मानले आहेत. यावेळी आपण आपला निर्णय बदलणार नसल्याचेही रायडूने सांगितले. अंबाती रायुडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रायुडू 2018 पासून सीएसकेकडून खेळत आहे. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 203 सामन्यांत 28.29 च्या सरासरीने 4329 धावा केल्या आहेत. रायुडूने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)