Ravindra Jadeja Visits Ashapura Temple: अष्टपैलू रवींद्र जडेजा पत्नीसह दर्शनासाठी पोहचला कच्छच्या माँ आशापुरा मंदिरात, पाहा या सुंदर जोडप्याचा फोटो

कच्छमधील माजी जडेजा शासकांची देवी आशापुरा मातेसाठी हे प्रतिष्ठित मंदिर 14व्या शतकात बांधले गेले. स्टार क्रिकेटरने याआधीही अनेक प्रसंगी या पवित्र धर्मस्थळाला भेट दिली आहे.

Photo Credit - Twitter

Ravindra Jadeja Visits Ashapura Temple: टीम इंडियाचा करिष्माई अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नुकताच पत्नी रिवाबासोबत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माँ आशापुरा मंदिरात पोहोचला आणि मातेचे आशीर्वाद घेतले. कच्छमधील माजी जडेजा शासकांची देवी आशापुरा मातेसाठी हे प्रतिष्ठित मंदिर 14व्या शतकात बांधले गेले. स्टार क्रिकेटरने याआधीही अनेक प्रसंगी या पवित्र धर्मस्थळाला भेट दिली आहे. 13 जानेवारी (शनिवार) जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आशापुरा मातेची प्रार्थना करताना स्वतःचा आणि पत्नीचा फोटो शेअर केला. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जडेजा संघात परतणार आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2024: प्रथमच इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार 'हे' 5 खेळाडू, कर्णधार रोहित शर्मा देणार संधी)

फोटो पहा

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Rivaba Jadeja (@rivabajadeja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now