आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद WPL मध्ये दिसणार एकत्र काॅमेट्री करताना, आता येणार डबल मजा
अशा परिस्थितीत आता हे दोन दिग्गज समालोचक म्हणून एकत्र दिसणार तेव्हा मजा द्विगुणित होणार आहे.
आता उद्या म्हणजेच 4 मार्चपासून महिला प्रीमियर लीग (WPL 2023) सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 4 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स (MI vs GT) यांच्यात होणार आहे. यादरम्यान मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) दोन्ही संघ आमनेसामने येतील. या वर्षी आकाश चोप्रा, व्यंकटेश प्रसाद, अंजुम चोप्रा, पूनम राऊत, रीमा मल्होत्रा, वेदा कृष्णमूर्ती, नताली जर्मनोस, केट क्रॉस, मेल जोन्स, झहीर खान आणि पार्थिव पटेल हे महिला प्रीमियरसाठी स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमाचे समालोचक म्हणून दिसणार आहेत. आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद अनेकदा एकमेकांशी वादात सापडताना दिसले आहे. अशा परिस्थितीत आता हे दोन दिग्गज समालोचक म्हणून एकत्र दिसणार तेव्हा मजा द्विगुणित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)