IND vs PAK सामन्यापुर्वी सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottIndoPakMatch, चाहत्यांकडून Jay Shah आणि BCCI वर टीका
चाहत्यांनी सोशल मीडियावर भारत-पाक (IND vs PAK) सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी (#BoycottIndoPakMatch) ही मोहीम राबवली गेली आहे.
14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या रोमांचक सामन्याबद्दल भारतातील क्रिकेट चाहते उत्सुक असतानाच काही चाहत्यांनी सोशल मीडियावर भारत-पाक (IND vs PAK) सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी (#BoycottIndoPakMatch) ही मोहीम राबवली गेली आहे. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कथित पाकिस्तानशी संबंध असल्याच्या कारणावरून भारत-पाक सामन्याचा हा निषेध करण्यात येत आहे. तसेच पाकिस्तान संघाचे भारतात जोरदार स्वागत झाल्यामुले चाहते बीसीसीआयवरही नाराज आहे. दरम्यान, बीसीसीआयने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक सामन्यापूर्वी एका संगीत कार्यक्रमाची योजना आखली आहे, ज्यामध्ये शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि अरिजित सिंग यांसारखे बॉलिवूड स्टार सादर करतील अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या या पावलावर अनेक चाहते संतापले आहेत. विशेषत: जेव्हा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा केला गेला नव्हता.