Rohit Sharma Special Welcome By Childhood Friends: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माचं बालपणीच्या मित्रांनी केलं खास स्वागत (Watch Video)
या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Special Welcome By Childhood Friends: T-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत विश्वविजेता म्हणून पुनरागमन करणाऱ्या टीम इंडियाचे गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भव्य स्वागत करण्यात आले. चाहत्यांनी खेळाडूंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि यादरम्यान जेव्हा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने भाषण केले तेव्हा अनेक खेळाडू भावूक झाले. यावेळी अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या डोळे भरून आले. दरम्यान, या भव्य स्वागतानंतर आता रोहित शर्माच्या बालपणींच्या मित्रांनी (Childhood Friends) त्याचं खास स्वागत केलं. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आपल्या बालमित्रांना पाहून आनंदी झाल्याचं दिसत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)