IND vs IRE T20 Series 2023 Schedule: वेस्ट इंडिज नंतर भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची खेळणार टी-20 मालिका, येथे पहा संपूर्ण वेळापत्रक
आयसीसीने ट्विट करत वेळापत्रकाची पुष्टी केली आहे. आयसीसीने लिहिले- मालाहाइड पार्टीसाठी कोण तयार आहे. आयर्लंड ऑगस्टमध्ये तीन सामन्यांच्या टा-20 मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवणार आहे.
IND vs IRE T20 Series 2023: क्रिकेट आयर्लंडने भारताविरुद्धच्या (IND vs IRE) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले (T20 Series 2023 Schedule) आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ आयर्लंडला पोहोचणार आहे. ही मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तिन्ही टी-20 सामने मालाहाइडमध्ये खेळवले जातील. आयसीसीने ट्विट करत वेळापत्रकाची पुष्टी केली आहे. आयसीसीने लिहिले- मालाहाइड पार्टीसाठी कोण तयार आहे. आयर्लंड ऑगस्टमध्ये तीन सामन्यांच्या टा-20 मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली असली तरी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झालेला नाही. वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय एकत्रितपणे संघ जाहीर करेल, असे मानले जात आहे.
आयर्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना - 18 ऑगस्ट, मालाहाइड
दुसरा सामना - 20 ऑगस्ट, मालाहाइड
तिसरा सामना - 23 ऑगस्ट, मालाहाइड
Who’s ready for a Malahide party❓
Ireland will host India for a three-match T20I series in August.
📝 #IREvIND Fixture Details ⬇️ https://t.co/FYu5zor5ip
— ICC (@ICC) June 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2023 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

