Afghanistan Squad for Asian Games 2023 Announced: अफगाणिस्तानने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ केला जाहीर, 'या' खेळाडूंना संघात मिळाले स्थान
गुलबदिन नायबला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर युवा आणि अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.
आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) मधील क्रिकेट सामने 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील. आशियाई खेळ 2023 चे आयोजन चीनमधील हांगझोऊ येथे होत आहे. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष संघाची घोषणा केली आहे. गुलबदिन नायबला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर युवा आणि अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. एसीसी पुरुषांच्या उदयोन्मुख आशिया कप 2023 मध्ये सहभागी झालेल्या बहुतेक खेळाडूंना अफगाणिस्तान संघात संधी मिळाली आहे. यामध्ये नूर अली जद्रान, झुबैद अकबरी, शराफुद्दीन अश्रफ, सय्यद अहमद शिरजाद आणि शाहीदुल्ला कमाल या खेळाडूंचाही समावेश आहे.
आशियाई स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघ:
गुलबदीन नायब (कर्णधार), मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), सेदीकुल्ला अटल, झुबैद अकबरी, नूर अली जद्रान, शाहीदुल्ला कमाल, अफसर झझाई, वफीउल्लाह तरखिल, करीम जन्नत, शराफुद्दीन अश्रफ, फरीद अहमद मलिक, निजात मसूद, सय्यद अहमद शिरजाद, कैस अहमद. आणि झहीर खान.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)