Afghanistan's Asia Cup 2023 Squad Announced: आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर, तीन दिग्गजांचे पुनरागमन, नूर अहमदलाही संधी
हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी नजीबुल्ला झद्रान, करीम जनात आणि रहमत शाह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत हे तिन्ही खेळाडू संघाचा भाग नव्हते.
Afghanistan's Asia Cup 2023 Squad Announced: अफगाणिस्तानने आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी आपला संघ जाहीर केला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण 17 खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. तीन स्टार खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे, तर आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्ससाठी छाप पाडणारा युवा गोलंदाज नूर अहमदचीही आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी नजीबुल्ला झद्रान, करीम जनात आणि रहमत शाह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत हे तिन्ही खेळाडू संघाचा भाग नव्हते. नजीबुल्ला गुडघ्याच्या दुखापतीने उपचार घेत होता, तर रहमत शाह 2 सामन्यांसाठी तंदुरुस्त नव्हता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)