Afghanistan Cricket Team: अफगाणिस्तान संघ टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी UAE ला रवाना, 3 नोव्हेंबर रोजी भारताशी होणार सामना

अफगाणिस्तान क्रिकेट संघ 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी काबूलहुन रवाना झाला आहे. आज, बुधवारी ते संयुक्त अरब अमिराती (यूएई) साठी रवाना झाले आहेत. अफगाणिस्तानच्या टी-20 विश्वचषक मोहिमेला 25 ऑक्टोबरपासून शारजामध्ये सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान भारताच्या गटात असून 3 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील.

अफगाणिस्तान क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/TOLOnews)

Afghanistan Cricket Team: अफगाणिस्तान क्रिकेट (Afghanistan Cricket) संघ 2021 टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत भाग घेण्यासाठी काबूलहुन रवाना झाला आहे. आज, बुधवारी ते संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) साठी रवाना झाले आहेत. देशात तालिबान (Taliban) राजनंतर देशातील क्रिकेट संघाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, तालिबान शासकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर अफगाणिस्तान बोर्डाने देशातील क्रिकेटपटूंना विश्वचषकात खेळण्याची व्यवस्था केली.

अफगाणिस्तानच्या टी-20 विश्वचषक मोहिमेला 25 ऑक्टोबरपासून शारजामध्ये सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान भारताच्या (India) गटात असून 3 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement