BNG vs AFG, Asia Cup 2022: अफगाणिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून केला पराभव, सुपर 4 मध्ये मिळवली एन्ट्री
अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला होता.
आशिया कप 2022 चा तिसरा सामना मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यात खेळला गेला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या ब गटातील या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आणि सुपर 4 साठी पात्र ठरले. बांगलादेशकडून मोसाद्देक हुसेनने नाबाद 48 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने नाबाद 42 आणि नजीबुल्ला झद्रानने नाबाद 43 धावा केल्या. अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)