SRH vs RCB: अभिषेक शर्माच्या गगनचुंबी षटकारने फोडला गाडीची काच, 'टाटा कर्व्ह'चा चेहरामोहरा बदलला

अभिषेकने नेहमीप्रमाणे वादळी पद्धतीने शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्याने असा षटकार मारला की मैदानावर उभ्या असलेल्या गाडीची काच फुटली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit- X

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad, TATA IPL 2025 65th Match: सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने षटकार मारत कारची काच फोडली आहे. हे प्रकरण एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्याशी संबंधित आहे. अभिषेकने नेहमीप्रमाणे वादळी पद्धतीने शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्याने असा षटकार मारला की मैदानावर उभ्या असलेल्या गाडीची काच फुटली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल सामन्यांमध्ये 'टाटा कर्व्ह' कार प्रायोजक म्हणून उपस्थित असते. ही कार 'कर्व्ह सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन' पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला दिली जाते. याचा अर्थ असा की आयपीएल 2025 मध्ये किमान 100 चेंडू खेळणाऱ्यांमध्ये ज्या खेळाडूचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम असेल त्याला ही चमकदार कार बक्षीस म्हणून दिली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement