AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत खेळले क्रिकेट, हृदयस्पर्शी क्षण (Watch Video)

एबी डिव्हिलियर्सने मुंबईतील मरीन लाईन्स येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले.

PC-X

AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने मरीन लाईन्स (Marine Lines) येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा हा माजी खेळाडू व्हीलचेअरवर बसून फलंदाजी करताना दिसला. त्याने ऑफसाइडवर जोरदार  शॉट मारला. ज्यामुळे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सर्वांनी  टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. नंतर त्याने रॅम्प शॉट देखील खेळला. एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) व्हीलचेअरवर बसून धावा केल्या, स्ट्राईक बदलला. मुंबई व्हीलचेअर टीमच्या सराव सत्रादरम्यान माजी क्रिकेटपटूच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement