India A Squad: भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी 'अ' संघाची घोषणा, संजू सॅमसनकडे कर्णधारपदाची धुरा
22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील सर्व सामने चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत.
न्यूझीलंड 'अ' संघ सध्या भारत दौऱ्यावर (IND vs NZ) आहे. या दोन्ही संघांमध्ये 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे (ODI) मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारत 'अ' संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने या संघाची निवड केली असून त्याचे कर्णधारपद संजू सॅमसनकडे (Sanju Samson) सोपवण्यात आले आहे. T20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू न शकलेल्या संजूसाठी ही आनंदाची बातमी आहे. 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील सर्व सामने चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. पहिला सामना 22, दुसरा सामना 25 आणि तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
भारत अ संघ
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, राहुल चहर, टिळक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राजन कुमार, राजकुमार बावा.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)