Snake in Mitchell Johnson Room: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या हॉटेलच्या रुममध्ये निघाला साप, शेअर केला फोटो

जॉनसननं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Snake in Mitchell Johnson Room: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या हॉटेलच्या रुममध्ये निघाला साप, शेअर केला फोटो
Mitchell Johnson (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्सकडून खेळत आहे. इंडिया कॅपिटल्सचा सामना बुधवारी भिलवाडा किंग्जशी होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी जॉन्सन सध्या लखनऊमध्ये आहे आणि त्याच्या हॉटेलच्या रुममधून साप निघाला आहे, ज्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सापाचा फोटो शेअर करताना जॉनसनं कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, "माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ साप आढळला आहे." तसेच हा कोणत्या प्रकारचा साप आहे? असाही प्रश्न त्यानं क्रिकेट चाहत्यांना विचारलाय. जॉनसननं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitchell Johnson (@mitchjohnson398)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2022 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).