Shikhar Dhawan and Ayesha Mukherjee Divorce Case: 'मुलावर एकट्या आईचा अधिकार नाही...', कोर्टाने शिखर धवनच्या पत्नीला मुलाला भारतात आणण्याचे दिले आदेश
कोर्टाने क्रिकेटर शिखर धवनची पत्नी आयशा हिला त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर, कोर्टाने हा निकाल देत एकट्या आईचा मुलावर अधिकार नसतो आणि आयेशा मुखर्जीला आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचा (Shikhar Dhawan) मुलगा जोरावरही पत्नी आयेशा मुखर्जीपासून (Ayesha Mukherjee) विभक्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याच्या आईसोबत राहत आहे. दरम्यान, दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने क्रिकेटर शिखर धवनची पत्नी आयशा हिला त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर, कोर्टाने हा निकाल देत एकट्या आईचा मुलावर अधिकार नसतो आणि आयेशा मुखर्जीला आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत. शिखर आणि त्याचे कुटुंब ऑगस्ट 2020 पासून मुलाला भेटलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची भेट न झाल्याबद्दल न्यायालयाने तिला फटकारले आहे. घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडीबाबत सुरू असलेले प्रकरण शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्यात घटस्फोट आणि मुलाच्या ताब्याबाबत खटला सुरू आहे. याआधी धवनने न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये आयशा आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता न्यायालयाने त्यांच्या मुलाला भारतात पाठवण्याचे मोठे आदेश दिले आहेत. या दोघांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये कायदेशीर खटले दाखल आहेत.
Mother alone does not have right over child: #DelhiHighCourt in #ShikharDhawan's case
Read: https://t.co/6tt7k3DrPr pic.twitter.com/I3vYvRPrDG
— IANS (@ians_india) June 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2023 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

