Wahab Riaz Announced Retirement: आशिया कपपूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का, वेगवान गोलंदांज वहाब रियाझने केली निवृत्तीची घोषणा
वहाबने पाकिस्तानकडून 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक खेळला आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने (Wahab Riaz) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. पण, त्याने 15 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तात्काळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. वहाबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळले. 2020 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वहाबने वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता त्याच्या निवृत्तीवरून तो 2023 चा विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वहाबने 2011, 2015 आणि 2019 चा विश्वचषक पाकिस्तानसाठी खेळला आहे.
Tags
Asia Cup 2023
Breking
ICC ODI World Cup 2023
Pakistan
Sports Breking
Sports News
Sports News Marathi
Wahab Riaz
Wahab Riaz Announced Retirement
Wahab Riaz retirement
आशिया कप 2023
क्रीडा बातम्या
पाकिस्तान
ब्रेकिंग
वहाब रियाझ
वहाब रियाझ निवृत्ती
वहाब रियाझने केली निवृत्तीची घोषणा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३
स्पोर्ट्स न्यूज मराठी
स्पोर्ट्स ब्रेकिंग