43 Runs In One Over: इंग्लंडचा गोलंदाज Ollie Robinson चा लाजिरवाणा विक्रम; क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडे ओव्हर, दिल्या 43 रन्स (Watch Video)
काऊंटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, रॉबिन्सनने एका षटकात 43 धावा दिल्या.
Louis Kimber Smashes Record Over Against Ollie Robinson: क्रिकेटमध्ये असे काही रेकॉर्ड आहेत जे सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. आता असाच एक विक्रम इंग्लंडमध्ये झाला आहे. टी-20 क्रिकेटच्या शर्यतीत आता कसोटी किंवा प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही खेळाडूंनी तुफानी फलंदाजी सुरू केली आहे. काऊंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात लीसेस्टरशायरच्या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीने सर्वांना चकित केले. लुईस किम्बरने इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या षटकात तब्बल 43 धावा ठोकल्या.
काऊंटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, रॉबिन्सनने एका षटकात 43 धावा दिल्या. क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने एका षटकात घेतलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लुईस किम्बरने शानदार फलंदाजी करताना या षटकात सहा चौकार आणि दोन षटकारांसह 37 धावा केल्या, तर एक धाव घेतली. या षटकात रॉबिन्सनने तीन नो बॉल टाकले, ज्याची पेनल्टी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये 2 धावा आहे. (हेही वाचा: David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जेक-फ्रेझर मॅकगर्कला उत्तराधिकारी केले नियुक्त, इंस्टाग्रामवर शेअर केली स्टोरी)
पहा व्हिडिओ-
43 RUNS IN ONE OVER!
Leicestershire's Louis Kimber smashes a record over against Ollie Robinson 🤯
(via @CountyChamp) pic.twitter.com/GVlrvNXGLb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2024 07:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

