RSWS: 7 चेंडूत 4 षटकार, 1 चौकार, इरफान पठाणने मिळवला विजय, फायनलमध्ये इंडिया लिजंड्स

गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया लेजेंड्सचा पराभव करून इंडिया लिजेंड्सने (INDL vs AUSL) अंतिम फेरीत प्रवेश केला.

Photo Credit - Twitter

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) इंडिया लीजेंड्सने (India Legends) आपली अप्रतिम कामगिरी सुरू ठेवली आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया लेजेंड्सचा पराभव करून इंडिया लिजेंड्सने (INDL vs AUSL) अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 171 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंडिया लिजेंड्सने 5 गडी गमावून 4 चेंडू आधी लक्ष्य गाठले. इंडिया लिजेंड्सकडून नमन ओझाने सर्वाधिक नाबाद 90 धावा केल्या. त्याच्याशिवाय इरफान पठाणने 7व्या क्रमांकावर उतरून अवघ्या 12 चेंडूत 37 धावा करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाकडून बेन डंकने 46, अॅलेक्स डूलनने 35 आणि शेन वॉटसनने 30 धावा केल्या मात्र ओझा आणि पठाणच्या पॉवर हिटिंगसमोर ऑस्ट्रेलियन संघ टिकू शकला नाही आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement