Video: 20 वर्षीय वेगवान गोलंदाजाचा कहर; स्टंपचे झाले दोन तुकडे, फलंदाजही घाबरला (Watch Video)
रवांडाच्या मार्टिनने बोस्टवानाविरुद्ध असा चेंडू टाकला की स्टंपचेही 2 तुकडे झाले.
20 वर्षीय मार्टिन अकायेजूने आपल्या कहरात टाकणाऱ्या चेंडूंनी फलंदाजाला घाबरवले. क्वालिफायरमध्ये मार्टिनचा चेंडू पाहून फलंदाज हादरले. रवांडाच्या मार्टिनने बोस्टवानाविरुद्ध असा चेंडू टाकला की स्टंपचेही 2 तुकडे झाले. आयसीसीने मार्टिनच्या भयानक गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या चेंडूने चाहत्यांना मिचेल स्टार्कच्या चेंडूची आठवण करून दिली, जो त्याने गेल्या वर्षी बार्बाडोसमध्ये डॅरेन ब्राव्होविरुद्ध टाकला होता. स्टार्कच्या चेंडूने स्टंप उखडला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)