IND vs NZ 1st T20I Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामन्याला थोड्यात वेळात होणार सुरुवात, जाणून घ्या सामना कधी, कुठे पाहणार

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा पहिला T20 भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.00 वाजता सुरू होईल.

Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना थोड्या वेळात रांची येथे खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. या मालिकेत भारतीय संघाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनरकडे आहे. केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचा भाग नाही. टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली या फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा पहिला T20 भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता होईल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.