IND vs BAN: बांगलादेशने नाणेफेक जिंकली, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाची धुरी केएल राहुलच्या हाती

मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

IND vs BAN (Photo Credit - BCCI)

टीम इंडिया आज बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. भारताने याआधीच मालिका गमावली आहे. आता शेवटचा सामना जिंकून इज्जत वाचवण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

या मालिकेत कर्णधार रोहित शर्मासह तीन खेळाडू जखमी झाल्याने भारतासाठी हे आव्हान आणखी कठीण झाले आहे.   रोहित शर्मा आणि दीपक चहर गेल्या सामन्यात जखमी झाले होते, तर कुलदीप सेनला पहिल्या वनडेनंतर दुखापत झाली होती. रोहित शर्मा आधीच या मालिकेतून बाहेर आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल जबाबदारी सांभाळणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वनडेसाठी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement