Arjun Tendulkar Video: अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील 'तो' व्हायरल व्हिडिओ फेक, नवी क्लिप आली समोर

काहींनी अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर उलट करून शेअर केला आहे.

Arjun Tendulkar Video

Arjun Tendulkar Video: आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यात सामना खेळला गेला. यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा 55 धावांनी पराभव केला. या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) काहीसा किळसवाणा प्रकार करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल (Viral Video) होणाऱ्या या व्हिडिओत अर्जुन नाकात बोट घालताना दिसत आहे आणि मग तेच बोट तो तोंडात घालतो. पण मुळात त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर बोट नाकात घातले. त्याचा हा प्रकार कॅमेरामनने आपल्या व्हिडिओत कैद केला.नंतर काहींनी अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर उलट करून शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now