Viral Video: काय सांगता! चक्क हत्तीने कचराकुंडीत उचलून टाकला कचरा, पहा व्हिडिओ

हत्तीने कचरा कुंडीत कचरा टाकून प्राणी मानवापेक्षा जास्त शिस्तबद्ध असल्याचं उदाहरण ठेवलं आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती कचऱ्याच्या डब्याजवळ येत आहे आणि नंतर त्याची सोंड आणि पाय वापरून कचरा उचलून डब्यात टाकताना दिसत आहे.

Viral Video: काय सांगता! चक्क हत्तीने कचराकुंडीत उचलून टाकला कचरा, पहा व्हिडिओ
Elephant Viral Video (PC - Twitter)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या हत्तीने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या हत्तीने कचराकुडींशेजारी पडलेला कचरा उचलून कचराकुडींत टाकला. कचरा उचलण्यासाठी आणि योग्य ठिकाणी टाकण्यासाठी हत्तीने सोंडीचा वापर केला. माणसं पाहिजे तिथे कचरा टाकत असताना प्राणी त्याच्यासमोर आदर्श ठेवत आहेत. हत्तीने कचरा कुंडीत कचरा टाकून प्राणी मानवापेक्षा जास्त शिस्तबद्ध असल्याचं उदाहरण ठेवलं आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती कचऱ्याच्या डब्याजवळ येत आहे आणि नंतर त्याची सोंड आणि पाय वापरून कचरा उचलून डब्यात टाकताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "सफारी चौकीवरील कचरा कचरापेटीत टाकताना हत्ती" (हेही वाचा - Snake Viral Video: 15-फूट-लांब किंग कोब्राला सर्प मित्राने केलं रेस्क्यू; व्हिडिओ पाहून फुटेल तुम्हाला घाम, Watch)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2023 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).