Texas Shocker: टेक्सासमध्ये कारवरील बर्फ पुसण्यासाठी व्यक्तीने वायपर म्हणून केला 3 महिन्यांच्या बाळाचा वापर; पोलिसांकडून चौकशी सुरु (Video)
या महिन्याच्या सुरुवातीला राज्याला दुर्मिळ हिमवादळाचा तडाखा बसल्यानंतर हा व्हिडिओ ह्यूस्टनपासून 90 मैल अंतरावर असलेल्या पोर्ट आर्थरमध्ये घेण्यात आला होता.
अमेरिकेच्या टेक्सासमधून एक धक्कादायक घटना समोर अली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या गाडीवरील बर्फ पुसण्यासाठी वायपर म्हणून चक्क 3 महिन्यांच्या बाळाचा वापर केला आहे. हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती 3 महिन्यांच्या बाळाचा वापर करून त्याच्या गाडीवरील बर्फ काढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राज्याला दुर्मिळ हिमवादळाचा तडाखा बसल्यानंतर हा व्हिडिओ ह्यूस्टनपासून 90 मैल अंतरावर असलेल्या पोर्ट आर्थरमध्ये घेण्यात आला होता. अहवालानुसार व्हिडीओमधील व्यक्ती बाळाचा 25 वर्षीय बाप असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याच्यावर प्रतिक्रिया देत या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलीस आणि बाल संरक्षण सेवांकडून या व्यक्तीची चौकशी सुरू असून, त्याच्यावर अजून आरोप ठेवण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यापर्यंत त्याला जेफरसन काउंटी जिल्हा मुखत्यार कार्यालयाकडून अटक वॉरंट मिळू शकेल. (हेही वाचा: Hoshiarpur Shocker: शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण; विचलित करणारी दृश्य आली समोर)
कारवरील बर्फ पुसण्यासाठी वायपर म्हणून केला 3 महिन्यांच्या बाळाचा वापर-