Newly Purchased Car Crashes Temple Pillar: पूजेसाठी मंदिरात आणलेली नवीकोरी कार आदळी खांबावर (Watch Video)

खरेदी केलेली नवी कोरी कार मंदिरात पूजेला आणल्यानंतर खांबावर आदळली आणि अपघात घडला. ज्यामुळे कारमालकाच्या आनंदावर विरजण पडले. ही घटना तामिळनाडू राज्यातील कुड्डालोर जिल्ह्यातील श्रीमुश्नम भागातील एका मंदिरात घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेमध्ये कारचे मोठे नुकसान झाले.

खरेदी केलेली नवी कोरी कार मंदिरात पूजेला आणल्यानंतर खांबावर आदळली आणि अपघात घडला. ज्यामुळे कारमालकाच्या आनंदावर विरजण पडले. ही घटना तामिळनाडू राज्यातील कुड्डालोर जिल्ह्यातील श्रीमुश्नम भागातील एका मंदिरात घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेमध्ये कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, कारचा मालक मात्र थोडक्यात बचावला. प्राप्त माहितीनुसार, सुधाकरन नावाच्या व्यक्तीने ही कार खरेदी केली होती. नवीन कारचा आशीर्वाद पूजन समारंभ आटोपून कार पुढे नेत असताना हा अपघात झाला. वाहनाचे मालक सुधाकरन यांनी विधीनंतर वाहन पुढे हाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोंधळलेल्या सुधाकरनने चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला. त्यानंतर कार अनियंत्रितपणे पुढे झेपावली. अनेक पायऱ्या पार केल्यावर गाडी मंदिराच्या आवारात एका खांबासमोर थांबली. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारच्या बाजूने पाठीमागे ओढून ती थांबवताना दिसते आहे. (हेही वाचा, Pilibhit Viral Video: पिलीभीत जिल्हा रुग्णालय इमारतीमध्ये चक्क स्कूटरवरुन प्रवास, नर्सचा प्रताप व्हिडिओ व्हायरल )

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement