Son Hit Mother With Bat: फोन हिसकावून घेतल्याच्या रागातून 10 वर्षांच्या मुलाचा आईवर बॅटने हल्ला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch)

इतक्यात त्याची आई तिथे येते व ती मुलाला फोनच्या वापरावरून रागे भरते. ती त्याच्या हातामधील फोन काढून घेते व त्याला अभ्यासाला बसायला सांगते.

Son Hit Mother With Bat

Son Hit Mother With Bat: एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलाच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला. ही घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुलगा फोन पाहण्यामध्ये व्यस्त आहे. इतक्यात त्याची आई तिथे येते व ती मुलाला फोनच्या वापरावरून रागे भरते. ती त्याच्या हातामधील फोन काढून घेते व त्याला अभ्यासाला बसायला सांगते. मुलगा निमुटपणे सर्व काही ऐकतो. त्यानंतर थोड्यावेळाने तो आत जातो व नंतर शेजारी ठेवलेल्या बॅटने आईवर हल्ला करतो. आई बेशुद्ध पडते व मुलगा परत फोनवर खेळू लागतो.

अहवालानुसार, घटनेनंतर काही वेळाने घरातील इतर सदस्यांनी महिलेला पाहिले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलाचे वय केवळ 10 वर्षे असल्याने, ही घटना अधिकच चिंताजनक आहे. मोबाइल आणि डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय घातक परिणाम होऊ शकतात, हे या घटनेने अधोरेखित केले आहे. दुसरीकडे, अनेकांनी याला स्क्रिप्टेड व्हिडिओ देखील म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, 'हे स्क्रिप्टेड आहे, परंतु यातील संदेश खूप काही शिकवणारा आहे.’ (हेही वाचा: Maharashtra SSC Result 2023: मुलगा बनला आईचा गुरू! 10वीच्या परीक्षेत 43 वर्षीय आई आणि मुलाने मिळवलं उत्तुंग यश)

 मुलाचा आईवर बॅटने हल्ला-

(टीप- हा व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे, त्यामुळे लेटेस्टली मराठी याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif