Son Helping Mom-Dad Cute Video:सायकल चालवणाऱ्या पालकांना उड्डाणपूल ओलांडण्यासाठी लहान मुलाने केली मदत, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
त्या लहान मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Son Helping Mom-Dad Cute Video: सोशल मीडियावर अनेकवेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते.दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या लहान मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये तो लहान मुलगा सायकल चालवणाऱ्या पालकांना उड्डाणपूल ओलांडण्यासाठी मदत करत आहे. सुमारे 23 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक 10 वर्षांचा मुलगा सायकलवर बसलेल्या पालकांना सायकल ढकलून उड्डाणपूल ओलांडण्यास मदत करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ IAS अवनीश सरन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे – आयुष्यभर असेच पालकांचा आधार व्हावे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)