Shocking Video: अवघ्या 10 रुपयांच्या भाड्यासाठी ट्रान्सजेंडर महिलेने केली ऑटो ड्रायव्हरला मारहाण; भररस्त्यात काढली आपली पँट (Watch)

चांदणीने त्याला मारहाण केली. इतकेच नाहीतर तिने भांडणामध्ये रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर आपली पँट काढली.

ट्रान्सजेंडर महिलेने केली ऑटो ड्रायव्हरला मारहाण

ट्रान्सजेंडर महिला आणि ई-रिक्षा चालक यांच्यामधील भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आरोप आहे की, चांदणी नावाच्या या ट्रान्सजेंडर महिलेने केवळ 10 रुपयांचे अल्प भाडे देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर यावर रिक्षा चालकाने आक्षेप घेतला असता, चांदणीने त्याला मारहाण केली. इतकेच नाहीतर तिने भांडणामध्ये रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर आपली पँट काढली. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील बारी बायपासचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी हे लज्जास्पद कृत्य कधी घडले याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, गुरुवारी हा व्हिडिओ इंटरनेटवर आला आणि तेव्हापासून तो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चांदणी अर्ध नग्न होऊन चालकांना मारहाण करत आहे. (हेही वाचा: Viral Video: इंडिगो पॅसेंजरने विमानात उड्डाणादरम्यान Reel साठी केला डान्स, नेटीझन्स संतापले)

पहा व्हिडिओ (यामधील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात)-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now