Rs 3 Lakh Fee To Get Rich 'Rishtas': मुलीच्या लग्नासाठी फक्त श्रीमंत कुटुंबातूनच स्थळे यावीत, वडिलांनी भरली 3 लाख रुपये फी, पोस्ट व्हायरल (See Post)

या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एका व्यक्तीने आपल्या मुलीसाठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या श्रीमंत कुटुंबांची स्थळे यावीत म्हणून तब्बल 3 लाख रुपये फी दिली आहे.

Rs 3 Lakh Fee To Get Rich 'Rishtas': मुलीच्या लग्नासाठी फक्त श्रीमंत कुटुंबातूनच स्थळे यावीत, वडिलांनी भरली 3 लाख रुपये फी, पोस्ट व्हायरल (See Post)
Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Rs 3 Lakh Fee To Get Rich 'Rishtas': लोक नेहमीच आपल्या मुलांसाठी चांगला जोडीदार शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मुलीच्या कुटुंबाला तर मुलीला कसले स्थळ मिळते, तिचा जोडीदार कसा असेल, सासू-सासरे कसे असतील याबाबत जास्त चिंता असते. मुलीच्या आनंदासाठी वडील कोणत्याही थराला जायला तयार होतात. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर वापरकर्त्याने शेअर केलेली एक घटना दर्शवते की, मुलीला चांगले स्थळ मिळावे मिळावे म्हणून एका वडील काय करू शकतात.

या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एका व्यक्तीने आपल्या मुलीसाठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या श्रीमंत कुटुंबांची स्थळे यावीत म्हणून तब्बल 3 लाख रुपये फी दिली आहे. या यूजरने सांगितले की, तिच्या एका मैत्रिणीच्या वडिलांनी फक्त फी म्हणून 3 लाख रुपये भरले आहेत, जेणेकरून त्यांच्या मुलीचे फक्त श्रीमंत कुटुंबातील स्थळे येतील. या प्रकरणाने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे आणि लोक लग्नासाठी किती खर्च करण्यास तयार आहेत यावर चर्चेला उधाण आले आहे. (हेही वाचा: Man Marries Mother-In-Law: ऐकावे ते नवलंच! जावयाचे सासूशी अनेक महिन्यांपासून अफेयर; सासऱ्याला समजताच गावकऱ्यांसमोर लावून दिले लग्न)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2024 10:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).