Python Swallows Woman in Indonesia: इंडोनेशियामध्ये 16 फुट महाकाय अजगराने महिलेला पूर्णपणे गिळंकृत केले; पोटात आढळला मृतदेह
फरीदाचा शोध घेताना तिच्या पतीला तिचे काही सामान सापडले. त्यानंतर गावकऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता, त्यांना एक सामान्यपेक्षा मोठे पॉट असलेला अजगर दिसला. त्यावरून अजगराने फरीदाला गिळले असल्याची शक्यता बळावली.
Python Swallows Woman in Indonesia: मध्य इंडोनेशियामध्ये (Indonesia) एका महिलेला अजगराने पूर्णपणे गिळंकृत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महाकाय 16 फुट अजगराच्या पोटात ही महिला मृतावस्थेत आढळली. फरीदा असे तिचे नाव असून ती 50 वर्षांची होती. अहवालानुसार, दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग (Kalempang) गावातील चार मुलांची आई असलेली फरीदा, गुरुवारी रात्री बेपत्ता झाली होती. ती घरी न परतल्याने तिच्याबाबत शोध मोहीम सुरू झाली. अखेर तिचा पती आणि रहिवाशांना शुक्रवारी एका पाच मीटर (16 फूट) लांबीच्या अजगराने तिला पूर्णपणे गिळल्याचे लक्षात आले.
फरीदाचा शोध घेताना तिच्या पतीला तिचे काही सामान सापडले. त्यानंतर गावकऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता, त्यांना एक सामान्यपेक्षा मोठे पोट असलेला अजगर दिसला. त्यावरून अजगराने फरीदाला गिळले असल्याची शक्यता बळावली. त्यानंतर त्यांनी अजगराचे पोट कापण्याचे ठरवले. जसजसे ते अजगराचे पोट कापू लागले, तसतसे फरीदाचे डोके दिसू लागले. अखेर फरीदाचा पूर्ण मृतदेह अजगराच्या पोटात आढळला. ही घटना अतिशय दुर्मिळ घटनांपैकी एक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत इंडोनेशियात अजगराने लोकांना गिळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. (हेही वाचा: Rajasthan: राजस्थानमध्ये वेगवान कारची उंटाला धडक; काच फोडून उंट थेट कारमध्ये)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)