Porsche vs Bike Race Accident: पोर्श कारसोबत रेस करत होता बाईकस्वार; पुढे काय घडलं? पहा व्हिडिओ

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार पोर्श कारसोबत रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. शर्यत सुरू होताच त्या व्यक्तीने स्टंट करायला सुरुवात केली आणि दुचाकीचे पुढचे चाक उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला. दुचाकीचा वेग इतका जास्त होता की, तोल गेल्याने दुचाकीस्वार खाली पडला.

Porsche Accident Viral Video (PC - X/@crazyclipsonly)

Porsche Accident Viral Video: लोक प्रसिद्ध होण्यासाठी इतके वेडे आहेत की, ते आपला जीव पणाला लावतात. लाइक्स आणि व्ह्यूजचा खेळ लोकांच्या मनात इतका रुळला आहे की, ते यासाठी काहीही करायला तयार होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक बाईकस्वार पोर्श कारवर रेस लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण यादरम्यान, मोठा अपघात झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार पोर्श कारसोबत रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. शर्यत सुरू होताच त्या व्यक्तीने स्टंट करायला सुरुवात केली आणि दुचाकीचे पुढचे चाक उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला. दुचाकीचा वेग इतका जास्त होता की, तोल गेल्याने दुचाकीस्वार खाली पडला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now