Police Jeep Enters In AIIMS Rishikesh: विनयभंगाच्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची जीप ऋषिकेशमधील एम्सच्या जनरल वॉर्डमध्ये घुसली, व्हिडिओ व्हायरल (Watch)

विनयभंगाचा आरोप असलेल्या नर्सिंग अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी, पोलिसांचे अधिकृत वाहन एम्स ऋषिकेशच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये घुसले. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Police Jeep Enters In AIIMS Rishikesh

Police Jeep Enters In AIIMS Rishikesh: उत्तराखंडमधील ऋषिकेशमधून पोलिसांच्या वर्तनाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी या ठिकाणी पोलिसांनी एम्स ऋषिकेशच्या इमर्जन्सीमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात घातला. विनयभंगाचा आरोप असलेल्या नर्सिंग अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी, पोलिसांचे अधिकृत वाहन एम्स ऋषिकेशच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये घुसले. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अहवालानुसार, ऋषिकेश एम्समधील नर्सिंग अधिकाऱ्यावर एका महिला डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. यामुळे डॉक्टर प्रचंड संतापले होते. याबाबत तक्रार दाखल केल्यावर, मंगळवारी पोलिसांनी एम्समध्ये जाऊन आरोपीला अटक केली. मात्र यावेळी पोलिसांची जीप आरोपीला पकडण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत वॉर्डमधून गेली. बाहेर येताना ही जीप इमर्जन्सी वॉर्डातून परत आली. आरोपी सतीश कुमार याने रविवारी, 19 मे रोजी संध्याकाळी हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे सांगण्यात येत आहे. कुमारने महिला डॉक्टरला अश्लील एसएमएस पाठवल्याचेही वृत्त आहे. (हेही वाचा: Viral Video: मद्य वाहतूक करणारा ट्रक उलटला, दारुचे बॉक्स पळविण्यासाठी लोकांची झुंबड; बोईनपल्ली पोलिस स्टेशन परिसरात घटना)

पहा व्हिडिओ-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement