Taping Fish To ATMs: अमेरिकेतील उटाह (Utah) शहरातील एका किशोरवयीन मुलाने शहरातील विविध एटीएम (ATM Machines) आणि पोलिस कार (Police Car) मध्ये मासे (Fish) चिटकवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ओरेम आणि प्रोवो, उटाहच्या आसपासच्या एटीएम मशीनवर मासे चिटकवल्याप्रकरणी पोलिसांनी एका 17 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने कथित घटनांचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये एटीएमवर मासे काळ्या रंगाच्या टेपने चिटकवल्याचं दिसत आहे. काही पोस्ट्समध्ये माशाच्या तोंडात सिगारेट ठेवलेल्या दिसत आहेत. (हेही वाचा - Delhi Metro Women Fight: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा गोंधळ! दोन महिलांमध्ये जोरदार भांडण, पहा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)