Shocking Viral Video: भोपाळमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश पोस्टल सर्कलचे सहाय्यक संचालक (तांत्रिक) श्री सुरेंद्र कुमार दीक्षित हे एका कार्यक्रमामत बस आज की रात है जिंदगी, कल हम कहां, तुम कहां या गाण्यावर डान्स करत असताना अचानक जमिनीवर कोसळले. हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की डान्स करताना ते जमिनीवर पडतात. पोस्ट विभागाने 13 ते 17 मार्च दरम्यान मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे 34 व्या पोस्टल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्च रोजी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, लिंक रोड क्रमांक-1, भोपाळ येथे होणार होता. तत्पूर्वी 16 मार्च रोजी विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सुरेंद्र कुमार दीक्षित आपल्या मित्रांसोबत डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर अचानक त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि ते जमिनीवर पडताच त्यांचा मृत्यू होतो.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)